राष्ट्रपतींनी अद्याप त्यागपत्र स्वीकारले नाही !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचे त्यागपत्र दिलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा अजूनही न्यायाधीश आहेत. त्यांनी ९ एप्रिल २०२६ या दिवशी त्यांचे त्यागपत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवले होते; परंतु अद्याप ते स्वीकारण्यात आलेले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर त्यांचे नाव त्यागपत्र दिल्याच्या एक महिन्यानंतरही कायम आहे. त्यागपत्रात यशवंत वर्मा यांनी म्हटले होते की, ते तात्काळ माझे पद सोडत आहे.
⚖️ Justice Yashwant Varma Resignation Row Deepens: Still Officially a Judge Despite Quitting
Justice Yashwant Varma’s resignation from the Allahabad High Court was sent to President Droupadi Murmu on April 9, 2026, but has still not been accepted. As a result, his name remains… pic.twitter.com/UJNwoMI0DE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 7, 2026
न्यायाधिशांच्या त्यागपत्राविषयी न्यायालयाने काय म्हटले आहे ?
राज्यघटनेच्या कलम २१७ (१) नुसार जेव्हा एखादा न्यायाधीश स्वतः स्वाक्षरी करून त्यागपत्र राष्ट्रपतींकडे पाठवतो, तेव्हा त्याचे त्यागपत्र ग्राह्य धरले जाते. सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी १९७८ या दिवशी गोपालचंद्र मिश्रा प्रकरणात त्यागपत्र कसे कार्यान्वित होते ?, हे सांगितले होते.
न्यायाधिशांच्या खंडपिठाने म्हटले होते की, जेव्हा एखादा न्यायाधीश त्यागपत्र राष्ट्रपतींकडे पाठवतो, तेव्हा असे मानले जाते की, आता तो न्यायाधीश राहिला नाही; परंतु जर न्यायाधिशाने त्यागपत्राचा दिनांक भविष्यातील टाकला असेल, तर तो दिनांक येण्यापूर्वी तो त्यागपत्र मागे घेऊ शकतो. तथापि न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या प्रकरणात ‘तात्काळ’ त्यागपत्र दिल्याचे म्हटले आहे.
काय होते न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचे प्रकरण ?
न्यायमूर्ती वर्मा यांच्या देहलीतील अधिकृत निवासस्थानी जळलेल्या नोटा आणि रोकड सापडल्याचे प्रकरण समोर आले होते. यानंतर त्यांना पदावरून हटवण्यासाठी महाभियोगाच्या प्रक्रियेवर चर्चा चालू झाली होती.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे