Pakistan On Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानावर भारतीय सैन्याने आक्रमण केल्याचा पाकिस्तानचा दुष्प्रचार

नवी देहली – केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरावर आक्रमण केल्याचा दुष्प्रचार पाकिस्तानकडून सामाजिक माध्यमांवर करण्यात आला. ही वृत्ते पूर्णपणे खोटी आणि बनावट आहेत. पत्र सूचना कार्यालय आणि कोलकाता पोलीस यांनी स्पष्ट केले की, कोलकाता शहरात सैन्य घुसल्याची किंवा मुख्यमंत्र्यांवर आक्रमण झाल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. हे सर्व एका जाणीवपूर्वक रचलेल्या कटाचा भाग म्हणून पसरवलेला दुष्प्रचार आहे. ‘सामाजिक माध्यमांवर अशा प्रकारची दिशाभूल करणारी माहिती पसरवणार्‍यांवर पोलीस कठोर कायदेशीर कारवाई करत आहेत. जनतेने अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये’, असे आवाहन करण्यात आले आहे.

काय दावा करण्यात आला ?

सामाजिक माध्यमांवरील ‘अनुषी तिवारी’ नावाच्या खात्यावरून असा दावा करण्यात आला की, ‘मोठ्या संख्येने भारतीय सैन्य कोलकात्यात शिरत आहे. जनतेने सैन्याचा रस्ता रोखला आहे. या वेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांनी ममता बॅनर्जी यांच्या घरावर आक्रमण केले असून त्या घायाळ झाल्या आहेत. केंद्र सरकारने परदेशी दूतावास बंद करण्याचा आदेश दिला आह.’

पाकचे षड्यंत्र !

पत्र सूचना कार्यालयाने हे सर्व दावे खोटे असल्याचे सांगितले आहे. हा पाकिस्तानी यंत्रणेकडून चालवला जाणारा दुष्प्रचार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, शहरात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. जुने आणि या घटनेशी संबध नसलेले व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने जोडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

पाक डावपेचांत किती हुशार आहे, हे यावरून दिसून येते ! अशा पाकला समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देणे आवश्यक !