महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा देणार्‍यांवर कारवाई !

कोल्हापूर – शहरातील खरी कॉर्नर, मिरजकर तिकटी, देवकर पाणंद या तीन ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकल्या. यात महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा देणारे जागामालक-चालक यांच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चालक शुभम पाटील, आकाश कोरवी, संकेत ढाले, रतन पाल, अमरसिंह कामते या ५ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहे. शिरोली येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणानंतर हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन शहरात विविध ठिकाणी होणार्‍या अशा घटनांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. (या प्रकरणी महापालिका प्रशासनानेही संबंधित जागामालक, दुकानदार यांना ज्या कारणासाठी जागा देण्यात येते त्या कारणासाठी त्याचा वापर होतो का ? हे पडताळून तसा होत नसल्यास त्या कलमान्वयेही कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक)