रणरणत्या उन्हात ४० अंशाच्या तापमानात रांगा

छत्रपती संभाजीनगर – शहरातील नागरिकांना सध्या भीषण गॅसटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराचे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले असतांना अशा रणरणत्या उन्हात लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध यांना गॅस सिलिंडरसाठी दिवसभर रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि विस्कळीत पुरवठा यांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले आहेत.
१. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगितले जात आहे. केंद्र आणि राज्य स्तरावर सर्व काही सुरळीत असल्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष स्थिती विदारक आहे.
२. बीड बायपासजवळील सातारा परिसरातील ‘अहिल्या एच्.पी. गॅस’ एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ग्राहकांना फेब्रुवारी महिन्यापासून सिलिंडर मिळालेले नाहीत.
३. एका ग्राहकाने सांगितले की, २८ फेब्रुवारीला मिळालेल्या सिलिंडरनंतर आज २ महिने उलटूनही नवीन सिलिंडर मिळालेला नाही.
४. पैठण तालुक्यातील बिडकीनसारख्या ग्रामीण भागातून नागरिकांना तब्बल ३५ कि.मी.चा प्रवास करून शहरात यावे लागत आहे.
५. सातारा परिसर आता महानगरपालिकेत समाविष्ट झाला असला, तरी गॅस एजन्सीसाठी अजूनही ‘ग्रामीण’ भागाचेच निकष लावले जात आहेत. यामुळे ४५ दिवसांविना नोंदणी होत नाही, जो सर्वसामान्य कुटुंबासाठी मोठा अन्याय आहे.
६. रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांसाठी साध्या पिण्याच्या पाण्याची किंवा सावलीचीही व्यवस्था नाही. उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक नागरिकांना चक्कर येत आहे.
७. गॅस एजन्सीने पुरवठा अल्प असल्याचे कारण पुढे केले आहे. ‘लोक घरपोच सिलिंडरची वाट पहायला सिद्ध नाहीत, कारण टंचाईमुळे प्रत्येकाला भीती वाटत आहे’, असे एजन्सीच्या प्रतिनिधीने सांगितले.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित