लहान मुलांच्या मृत्यूच्या हानीभरपाईच्या संदर्भात भविष्यातील उत्पन्नाच्या शक्यतांचाही विचार व्हावा ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – लहान मुलांच्या मृत्यूशी संबंधित हानीभरपाई देतांना भविष्यातील उत्पन्नाच्या शक्यतांचाही विचार करावा, असे मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच सांगितले. ठाणे येथे ३ दशकांपूर्वी झालेल्या एका अपघाताच्या संदर्भात हानीभरपाईची रक्कम वाढवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाला (‘मॅक्ट’ला) दिले. (इतक्या वर्षांनी न्याय लागणे कितपत योग्य ? – संपादक)

वर्ष १९९७ मध्ये या संदर्भात झालेल्या निवाड्याला मुलाच्या पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कुटुंबाचा आधार गमावल्यामुळे हानीभरपाईत वाढ करण्याची मागणी पालकांनी केली होती. या संदर्भात निकाल देतांना न्यायालयाने या प्रकरणी ३० सहस्र रुपयांचे भविष्यातील वार्षिक उत्पन्न गृहित धरून त्याला

१५ ने गुणून एकूण ४ लाख ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचे आदेश पालकांना दिले. एवढेच नव्हे, तर दावा केल्याच्या दिवसापासून १२ टक्के वार्षिक व्याजही या रकमेवर लागू करण्याचे न्यायालयाने सांगितले.