अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
गर्दाचे मूल्य ८ लाख ४० सहस्र रुपये !

वसई-विरार – मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील अमली पदार्थ विरोधी कक्ष-२ ने एका धडक कारवाईत नालासोपारा (पूर्व) परिसरातून ४२ ग्रॅम गर्दा (ब्राऊन शुगर) जप्त केला आहे. या प्रकरणी इस्माईल अथर अली खान (वय २४ वर्षे) आणि फैजान सईद जुलजुले (वय २३ वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मूल्य ८ लाख ४० सहस्र रुपये आहे.
पहारा देत असतांना पोलिसांना २ संशयित दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करतांना दिसले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडल्यावर त्यांच्याकडे अमली पदार्थ आढळला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव