नसरापूर प्रकरणी प्रतिक्रिया

मुंबई – पीडितेच्या वडिलांशी २ मे या दिवशी मी दोन वेळा बोललो. या प्रकरणात वेळेत आरोपपत्र प्रविष्ट करून उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जलदगतीने खटला चालवला जाईल. याविषयी न्यायालयाला सरकारकडून पत्रही पाठवण्यात आले आहे. लोकशाही कायद्याने चालते. बालिकेवर अत्याचार करणार्या नराधमाला यमसदनी कसे पाठवायचे, त्याला मृत्यूदंड कसा होईल, यासाठी आमचा प्रयत्न आहे. हे प्रकरण वेगाने मार्गी लावले जाईल. नागरिकांचा रोष असणे स्वाभाविक आहे; कारण घटनाच गंभीर आहे. काही लोक मात्र हे प्रकरण वेगळ्या वळणावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकाराविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांकडे व्यक्त केली.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले