विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल या संघटनांनी आक्षेप घेतल्याचा परिणाम !
भक्तीगीतात अल्लाचा उल्लेख !
विडंबनात्मक गाण्यावर हिंदूंचे नृत्य !

डोंबिवली (ठाणे) – येथे एका हिंदु कुटुंबाच्या हळदीच्या कार्यक्रमात गायक सनी संते याने श्री एकविरादेवीच्या प्रसिद्ध भक्तीगीताचे विडंबन केले. देवीच्या गाण्याचे मूळ शब्द पालटून त्यात ‘अल्ला माझा कोणाला पावला ? पावला रफीक ये, रफीक ये मांडवाला, पावला महंमद ये, महंमद ये मांडवाला’ असे शब्द त्याने या भक्तीगतीतात घुसडले. त्याने मध्ये मध्ये शिवीगाळही केली. या गाण्यावर नाचणारेही हिंदूच होते; पण एकानेही याला विरोध केला नाही. याविरोधात ‘आग्री-कोळी हिंदुत्वनिष्ठ संघटना’ आक्रमक झाल्यावर गायकाने क्षमायाचना करत सांगितले, ‘‘यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही. मी क्षमा मागतो. कुणी असे गाणे म्हणण्याची मागणी केली, तरीही मी ते म्हणणार नाही. माझा ‘ऑर्केस्ट्रा’ बंद झाला, तरी चालेल.’’
Singer Sunny Sante forced to apologise after parodying a devotional song of Shri Ekvira Devi – after strong objections by VHP and Bajrang Dal.
🚨 Reference to “Allah” added in a devotional song
🚨 Hindus seen dancing to the parody
How long will “apologise later” culture… pic.twitter.com/Y6KL5JwZUF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2026
या विडंबनाच्या विरोधात विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुख आणि अंबरनाथ बजरंग दलाचे सहसंयोजक शुभम साळुंखे यांनी सामाजिक माध्यमांद्वारे तीव्र संताप व्यक्त करत म्हटले, ‘‘हा माणूस माझ्या हाताशी लागला, तर मी त्याचे डोके फोडेन; पण तो कुणाच्या हाताला लागला आणि त्यांनी त्याचे डोके फोडले, तर त्यांच्या जामिनाचा खर्च माझा.’’
(म्हणे) ‘हे सर्व मौजमजा म्हणून चालू आहे !’ – गायक सनी संतेगाणे म्हणत असतांना गायक सनी संते सर्वांना विनंती करत होता, ‘‘हे सर्व मौजमजा म्हणून चालू आहे. कुणीही याचा व्हिडिओ बनवू नका. नाहीतरी फरपट होईल. आमचा कार्यक्रम बंद होईल. (एकाही हिंदूने या वेळी विरोध का केला नाही ? – संपादक) |
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !