
पुणे – शहरातील ‘रेडी मिक्स काँक्रीट’ प्रकल्पांमुळे वाढलेल्या प्रदूषणाच्या तक्रारींची नोंद घेत महापालिका आयुक्त नवल किशोर राम स्वत: प्रकल्पांची पहाणी करणार आहेत. पुढील सप्ताहांमध्ये ते पहाणी करतील. त्या वेळी त्यांच्यासोबत ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे अधिकारीही सहभागी असतील, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
१. वडगाव खुर्द, धायरी, बावधन, लोहगाव, उंड्री, शेवाळवाडी येथे मोठ्या प्रमाणावर प्रकल्प कार्यान्वित आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्या प्रकल्पांवर पहाणीनंतर कठोर कारवाई केली जाईल.
२. परिसरात धूळ आणि प्रदूषण यांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी सिमेंटयुक्त राडारोडा आणि रासायनिक स्लरी (मिश्रण) थेट मुठा नदीत सोडले जाते. त्यामुळे पाण्याचा रंग पालटत आहे.
३. लोहगाव-खांदवेनगर परिसरातील ७ प्रकल्पांवर महापालिकेने कारवाई केली आहे.
आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, ‘प्रकल्पांची आवश्यकता मान्य असली, तरी ते नियमांनुसारच चालू पाहिजेत. नागरिकांना त्रास होणार नाही, प्रदूषण नियंत्रणाच्या निकषांचे पालन आवश्यक आहे.’
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन