गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळण्यासाठी गोभक्तांकडून तहसीलदारांना निवेदन

मिरज (जिल्हा सांगली), १ मे (वार्ता.) – संपूर्ण भारतात ‘गो सन्मान’ होणे, तसेच गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळणे यांसाठी लोकजागृतीचा भाग म्हणून भारतातील संत आणि गोभक्त यांनी अभियान राबवले आहे. या अभियानाच्या अंतर्गत गोभक्तांच्या स्वाक्षर्‍या घेऊन गोरक्षकांनी संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार कार्यालय येथे निवेदन दिले. या वेळी गुरुदेव तपोवन टाकळी मठातील शिवदेव स्वामीजी, गोरक्षक श्री. नितीन ओझा, हिंदु एकता आंदोलनाचे मिरज शहराध्यक्ष श्री. सोमनाथ गोटखिंडे, सर्वश्री किरण माळी, गजानन गोठखिंडे, विजय सिंह राजपूत आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी मिरजमधून ८ सहस्र ७०० गोभक्तांच्या स्वाक्षर्‍या घेऊन ते तहसीलदारांना देण्यात आले. आटपाडी येथेही तहसीलदारांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री राजेंद्रअण्णा देशमुख, विवेकानंद जितकर, सोमनाथ सरताळे, हणमंतराव देशमुख, जयमाला देशमुख, सुजाता जितकर आदी मान्यवर उपस्थित होते. आटपाडी येथे ११ सहस्र गोभक्तांच्या स्वाक्षर्‍या घेऊन निवेदन देण्यात आहे.