
मुंबई – रिक्शा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयानंतर त्यांना मराठी शिकण्यासाठी मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदी भाषिक चालक, तसेच विविध संघटना यांच्याकडून वेळ मागण्यात आली. २९ एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत रिक्शा आणि टॅक्सी यांच्या चालकांना मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्ट म्हणजे साडेतीन महिन्यांचा वेळ देण्यात येणार, असे ठरले.
मराठी शिकण्यासाठी एक विशेष पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. ही पुस्तिका राज्यातील सर्व राज्य परिवहन मंडळाच्या कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. सरनाईक म्हणाले की, ज्या संघटनांनी मराठी शिकण्यासाठी वेळ मागितला होता, त्यांचे दायित्व आहे की, त्यांनी चालकांना मराठी शिकवण्याची व्यवस्था करावी. कार्यालये, शाखा किंवा सभागृह यांमध्ये वर्ग घेऊन मराठीचे शिक्षण देण्याची सिद्धता संघटनांनी दर्शवली होती.
या पुस्तिकेत दैनंदिन वापरातील १५ ते १६ महत्त्वाची वाक्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. चालकांना ‘क्यू.आर. कोड’द्वारे ऑडिओ स्वरूपातही शिकवण्याची सोय केली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !