सनातनवर अपकीर्तीकारक खोटे आरोप करणार्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार !

फोंडा (गोवा) – गेल्या काही दिवसांपासून श्री. गौतम खट्टर यांनी फ्रान्सिस झेविअरच्या संदर्भात केलेल्या विधानावरून गोव्यात जाणीवपूर्वक धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. या वादाचा आडोसा घेऊन काही समाजकंटक सनातन संस्थेला विनाकारण लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संघटना असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले असून संस्थेच्या विरोधात कोणतेही पुरावे नसल्यामुळे बंदीची मागणीही फेटाळून लावली आहे. असे असतांनाही केवळ हिंदु धर्माचा द्वेष करण्यासाठी संस्थेची अपकीर्ती करणे, हा न्यायालयाचा अवमान आहे.
Gautam Khattar’s event was NOT organized by @SanatanSanstha
Spokesperson @1chetanrajhans stated the program was organised by Sanatan Dharma Raksha Samiti, and false claims are being spread to defame Sanatan Sanstha, Hindu Dharma, Saints, and places of faith.
A police complaint… pic.twitter.com/Wh2r3JSlKr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 29, 2026
या भारतविरोधी मानसिकतेच्या विरोधात सनातन संस्थेने फोंडा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार केली असून सनातन संस्थेची अपकीर्ती करणार्या समाजकंटकांविरुद्ध त्वरित गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी करत आहोत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी दिली आहे.

फ्रान्सिस झेविअरच्या कथित अवमान प्रकरणाच्या निमित्ताने काही व्यक्ती फेसबुक आणि अन्य सामाजिक माध्यमांवर पोस्ट, तसेच व्हिडिओ यांद्वारे सनातन संस्था, हिंदु धर्म, साधू-संत आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांची अपकीर्ती करत आहेत. या संदर्भात सनातन संस्थेची अधिकृत भूमिका खालीलप्रमाणे आहे.
१. अनेक व्हिडिओ आणि सामाजिक माध्यमांतील पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गौतम खट्टर यांचा कार्यक्रम सनातन संस्थेने आयोजित केला होता. हे विधान असत्य आहे. तो कार्यक्रम ‘सनातन धर्म रक्षा समिती’ या संस्थेने आयोजित केला होता. केवळ द्वेषापोटी सनातन संस्थेचे नाव या वादात ओढून संस्थेची प्रतिमा मलीन करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे.
२. मडगांव स्फोट प्रकरणात न्यायालयाने सर्व साधकांची आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.
३. स्वतः केंद्र सरकारनेही संस्थेच्या विरोधात पुरावे नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे. ज्यांना हे निकाल मान्य नाहीत, त्यांचा भारतीय राज्यघटनेवर विश्वास नाही, असेच म्हणावे लागेल.
‘विवा पोर्तुगाल’च्या घोषणा देणार्या भारतद्वेष्ट्यांचा सनातन संस्थेकडून तीव्र निषेध !
एका व्हिडिओमध्ये ‘विवा गोवा, विवा पोर्तुगाल’ (पोर्तुगालचा विजय असो) अशा घोषणा देऊन पोर्तुगीजधार्जिण्या मानसिकतेचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, सनातन संस्थेवर टीका करणार्या या प्रवृत्तींची निष्ठा भारतमातेशी नसून परकीय सत्तेशी आहे. गोव्यात राहून पोर्तुगालचा जयजयकार करणे, हा भारतीय सार्वभौमत्वाचा घोर अपमान आहे.
फ्रान्सिस झेविअरच्या निमित्ताने सनातन संस्थेला लक्ष्य करून केले जाणारे खोटे आणि बिनबुडाचे आरोप थांबले नाहीत, तर सनातन संस्था अशा लोकांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करेल. आम्ही फोंडा पोलीस ठाण्यात गोव्यातील सेबी वाझ यांच्यासह इतर दोषी व्यक्तींच्या विरोधात तक्रार केली आहे. त्यांच्या विरोधात त्वरित कारवाई करावी, ही आमची मागणी आहे.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी