पत्रकारांना योग्य मोबदला न देता आस्थापने त्यांनी सिद्ध केलेल्या बातम्यांचा आशय वापरून नफा कमवत असल्याचा सरकारचा दावा !
कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलिया सरकारने एक मोठे पाऊल उचलत लवकरच अमेरिकी डिजिटल आस्थापने ‘मेटा’, ‘गूगल’ आणि ‘टिकटॉक’ यांच्यावर कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या आस्थापनांनी वृत्तसंस्थांना योग्य मोबदला दिला पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून सरकार त्यांच्याकडून २.२५ टक्के कर आकारणार आहे. आस्थापनांना प्रसारमाध्यम संस्थांशी करार करण्यास भाग पाडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले. कायद्याचे प्रारूप जुलै मासात ऑस्ट्रेलियाच्या संसदेत मांडण्यात येणार आहे. हा कायदा झालाच, तर उद्या फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब यांसारख्या प्रथितयश सामाजिक माध्यमांवर कर लावला जाईल.
🇦🇺 Australia Draws the Line Against Big Tech
Australia is moving to impose a 2.25% tax on Meta, Google & TikTok unless they fairly compensate news publishers whose journalism drives traffic and profits.
Big Tech is protesting. Australia isn’t backing down. 💥
The message is… pic.twitter.com/H613xzB2rq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 29, 2026
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी स्पष्ट केले की, पत्रकारांनी केलेल्या कामाचे आर्थिक मूल्य निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी यावर जोर दिला की, मोठी बहुराष्ट्रीय आस्थापने पत्रकारांनी सिद्ध केलेल्या बातम्यांचा आशय वापरून नफा कमावतात. त्याच वेळी त्यांना योग्य मोबदला देत नाहीत. हे अजिबात स्वीकारार्ह नाही. सरकारचा अंदाज आहे की, या योजनेतून प्रतिवर्षी २०० ते २५० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स (अनुमाने १ सहस्र ३६० कोटी ते १ सहस्र ७०० रुपये) उत्पन्न मिळू शकते.
आस्थापनांकडून विरोध !
‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ यांचे आस्थापन असलेल्या ‘मेटा’ने असा यक्तीवाद केला की, वृत्तसंस्था आमच्या ‘प्लॅटफॉर्म’वर (व्यासपिठावर) स्वेच्छेने मजकूर प्रसारित करतात. याचे कारण असे केल्याने त्यांना लाभ होतो. आम्ही बातम्यांचा मजकूर घेतो, हा दावा चुकीचा आहे. हा एक प्रकारचा डिजिटल सेवा कर आहे, जो विकसित होत असलेल्या विज्ञापन उद्योगाला योग्यरित्या समजून घेण्यात अयशस्वी ठरतो.
‘गूगल’नेही या कराची आवश्यकता फेटाळून लावली. त्याने म्हटले आहे की, आम्ही वृत्त उद्योगाविषयी आधीच व्यावसायिक करार केले असून सध्याचा प्रस्ताव विज्ञापन बाजारात झालेल्या पालटांना विचारात घेण्यात अयशस्वी ठरतो.
ऑस्ट्रेलिया मात्र ठाम !
पंतप्रधान अल्बानीज यांनी अमेरिकेच्या संभाव्य प्रतिक्रियेवरील चिंता फेटाळून लावत म्हटले की, आम्ही एक सार्वभौम राष्ट्र आहोत आणि आमचे सरकार ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय हिताच्या आधारावर निर्णय घेईल.

पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण