
खंडवा (मध्यप्रदेश) – प्राण्यांची चरबी, हाडे आणि कातडे यांचा वापर करून तूप बनवल्याच्या आणि ते विक्री केल्याच्या आरोपावरून मध्यप्रदेशातील खंडवा येथे नुकतेच पोलिसांनी अनवर शेख बिस्मिल्लाह कुरेशी नावाच्या व्यक्तीला अटक केली. हा अवैध धंदा इमलीपुरा भागातील एका अरुंद गल्लीत चालू होता.
🚨 Fake Ghee Racket Busted in Madhya Pradesh 🚨
Anwar Qureshi arrested for manufacturing ghee using animal fat 🐄❌
Authorities seized animal hides, bones, horns, 69 containers & 9 drums filled with animal fat during the raid.
The adulterated ghee was reportedly supplied to… pic.twitter.com/mZZyEIRd6E
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 30, 2026
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पशूवैद्यकीय विभाग आणि पोलीस यांच्या एका संयुक्त पथकाने येथे धाड घातली. आरोपीच्या घरातून प्राण्यांची कातडी, हाडे, चरबीने भरलेले ६९ डबे आणि ९ ड्रम, प्राण्यांची शिंगे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. कुरेशी हे बनावट तूप स्थानिक बाजारपेठ, हॉटेल आदी ठिकाणी विकत होता. या प्रकरणी आरोपी कुरेशीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर खंडव्याच्या आमदार कांचन तन्वे यांनी घटनास्थळी भेट दिली. ‘हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. जिल्हा प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी तन्वे यांनी केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक