बाँब ठेवणारी व्यक्ती ठार : आतंकवादविरोधी पथकाकडून अन्वेषण चालू !
पतियाळा (पंजाब) – येथील शंभू आणि राजपुरा या रेल्वे स्थानकांमध्ये असलेल्या ‘मालवाहू रेल्वे रुळा’वर (‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’वर) बाँब ठेवतांनाच त्याचा स्फोट होऊन त्यात बाँब ठेवणारी व्यक्ती ठार झाली. २७ एप्रिलच्या रात्री उशिरा ही घटना घडली. या स्फोटामुळे रेल्वे रुळाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. घटनास्थळावरून एका अज्ञात व्यक्तीचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी कह्यात घेतला आहे.
🚨 Patiala, Punjab: Bomb explodes while being planted on a railway track.
The perpetrator was killed in the blast. ATS probe underway.
With rising lawlessness in Punjab, people are asking if “Government” and “Police” even exist there anymore. pic.twitter.com/jO7G8INVjS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 28, 2026
पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणानुसार ही व्यक्ती रेल्वे रुळावर बाँब ठेवण्याचा प्रयत्न करत असावी आणि त्याच वेळी बाँबचा स्फोट झाल्याने ती ठार झाली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पतियाळाचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपमहानिरीक्षक हे मोठ्या पोलीस ताफ्यासह, तसेच बाँबशोधक पथकासह घटनास्थळी पोचले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मोटारसायकली, वायर, इतर स्फोटक साहित्य आणि एक तुटलेला भ्रमणभाष जप्त केला आहे.
सध्या तेथे दुरुस्तीसाठी एका बाजूचा रुळ बंद करण्यात आले असले, तरी दुसर्या बाजूने रेल्वेची वाहतूक चालू आहे. पोलीस सध्या सर्व बाजूंनी या घटनेचे अन्वेषण करत असून लवकरच मोठा खुलासा होण्याचा दावा त्यांनी केला आहे.

लोहगडावरील मृत्यू घातपातच !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !