गोवा

डिचोली,२७ एप्रिल (वार्ता.) – भारतात गोहत्या बंदी करावी, गोमातेचे संरक्षण व्हावे, गोमातेला राष्ट्रमाता संबोधित करावे यांसाठी भारतभर गोरक्षकांच्या वतीने ‘गो सम्मान आवाहन अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाच्या अंतर्गत २७ एप्रिल आणि २७ जुलै या दिवशी भारत सरकारला निवेदन दिले जाणार आहे. माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना निवेदने दिली जाणार आहेत. गोव्यात २७ एप्रिल या दिवशी फोंडा आणि डिचोली येथे गोप्रेमींनी उपजिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. डिचोली येथे उपजिल्हाधिकारी शुभम् नाईक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मये येथील गोशाळेचे संचालक श्री. कमलाकांत तारी, उद्योजक श्री. रमाकांत शेट्ये आदी उपस्थित होते.

फोंडा येथे श्री झरेश्वर देवस्थान ते उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गोप्रेमींनी ढोल ताशांच्या गजरात २ गोवंशियांची मिरवणूक काढली आणि त्यानंतर उपजिल्हाधिकारी कौशिक आमोणकर यांना निवेदन देण्यात आले.
सिंधुदुर्ग

वेंगुर्ला – ‘गो सम्मान आव्हान अभियाना’च्या अंतर्गत तालुक्यातील गोपालक आणि गोप्रेमी यांनी २७ एप्रिलला तहसीलदार ओंकार ओतारी यांना निवेदन दिले. या वेळी बाबूराव खवणेकर, गिरीश फाटक, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, अधिवक्त्या सुषमा प्रभुखानोलकर, दिना आचार्य, गौरी मराठे, नितीन लिंगोजी यांच्यासह गोप्रेमी उपस्थित होते. या अभियानाचा उद्देश सांगतांना बाबूराव खवणेकर यांनी ‘गोमातेचे संरक्षण आणि गोमातेला ‘राष्ट्रमाता’ म्हणून दर्जा द्यावा, यासाठी हे अभियान देशभर राबवले जात आहे. हे निवेदन पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे’, असे सांगितले.

या अनुषंगाने कुडाळ शहरात २७ एप्रिलला शहरातील साई मंदिर, हिंदु कॉलनी ते तहसील कार्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर कुडाळचे नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !