अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची शिक्षण खात्याकडे मागणी

पणजी, २७ एप्रिल (प्र.प.) – गोव्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांकडून प्रवेश प्रक्रियेच्या वेळी ‘प्रॉस्पेक्टस’च्या नावाखाली जी अनधिकृत शुल्क वसुली चालू आहे, त्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (अभाविपकडून) तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. यासंबंधीचे निवेदन त्यांनी शिक्षण खाते सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांना दिले आहे.
या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी अभाविपने शिक्षणमंत्री आणि शिक्षण संचालक यांना पुढील २ प्रमुख पर्याय सुचवले आहेत. ज्याप्रमाणे अनेक महाविद्यालये त्यांची माहिती पुस्तिका ऑनलाईन प्रसिद्ध करतात, त्याच धर्तीवर उच्च माध्यमिक विद्यालयांनी ‘प्रॉस्पेक्टस’च्या पीडीएफ (PDF) स्वरूपात संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून द्याव्या. ज्याप्रमाणे उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये प्रवेशाच्या वेळी ‘प्रॉस्पेक्टस’ सुलभ आणि विनामूल्य उपलब्ध करून देण्यावर भर देत आहेत, तसेच धोरण उच्च माध्यमिक विद्यालयांनीही राबवावे. शिक्षण विभागाने शासन निर्णय काढून ‘प्रॉस्पेक्टस’साठी अधिकाधिक १०० रुपयांची मर्यादा आखून द्यावी, तसेच छापील प्रती घेण्याची सक्ती न करता ऑनलाईन विनामूल्य डाऊनलोडची सुविधा द्यावी. ज्या शाळा अवाजवी शुल्क आकारत आहेत, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अशा प्रकारचे ‘प्रॉस्पेक्टस’ अव्वाच्या सव्वा शुल्क देऊन घेतले आहेत, त्या विद्यार्थ्यांना पैसे परत करण्यात यावेत.
अभाविप कोंकण प्रांत सहमंत्री यश कंटक यांचे म्हणणे आहे की, काही विद्यालये विनामूल्य माहिती पुस्तिका देतात, तर काही ठिकाणी १ सहस्र रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. ही लूट आहे. हा भेद अन्यायकारक आहे. माहिती पुस्तिका हे लाभ कमवण्याचे साधन नसून ती केवळ माहिती पुस्तिका आहे. जर विद्यार्थ्यांच्या खिशाला कात्री लावणारी ही वसुली थांबली नाही आणि शुल्कावर मर्यादा आली नाही, तर विद्यार्थी अन् पालक यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल.
राज्य शिक्षण संचालनालयाकडून परिपत्रक प्रसारित
तक्रारींनंतर राज्य शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांना माहितीपत्रक (प्रोस्पेक्टस) आणि प्रवेश अर्जांच्या किमती नियंत्रित करण्याचे निर्देश देणारे एक परिपत्रक जारी केले आहे. संचालनालयाने प्रसारित केलेल्या परिपत्रकानुसार, माहितीपत्रकाची किंमत, प्रवेश अर्जांसहित एकत्रित केल्यास, १०० रुपये किंवा प्रत्यक्ष छपाई खर्च यांपैकी जी रक्कम अल्प असेल, त्यापेक्षा अधिक नसावी.
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !
मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मिडिया हब’ उभारणार !
आंबिवली (कल्याण) येथील इराणी लोकांकडून बसवर दगडफेक; प्रवासी घायाळ
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !