सातारा येथे हिंदुत्वनिष्ठांची मागणी

सातारा, २७ एप्रिल (वार्ता.) – कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून महाराजांचा अवमान तर करतेच, इतकेच नाही, तर या पुस्तकात अनेक घटना या इतिहासाचे विकृतीकरण करून खोटा इतिहास बिंबवण्यासाठी लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला आणि संबंधित घटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन झाल्यावर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता दत्तात्रय सणस, कार्यकारिणी सदस्य श्री. उमेश गांधी, पाटीदार समाजाचे श्री. जयंतीभाई पटेल, श्री. रामजी भाई पटेल, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. विजय गाढवे, माजी शहराध्यक्ष श्री. जितेंद्र वाडेकर, सेवानिवृत्त माजी सैनिक संघटनेचे
श्री. राजकुमार सावंत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. प्रदीप साळवे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अधिवक्ता जनार्दन कर्पे, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे, श्री. सुरेश पंडित, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. हेमंत सोनवणे, श्री. शंकर पवार यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनीही आंदोलनाला संबोधित केले.
छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणार्या प्रकाशकावर फौजदारी गुन्हा नोंद करा ! – विजय गाढवे
‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाद्वारे छत्रपती शिवरायांची पूर्णत: चुकीची प्रतिमा निर्माण केली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘एकेरी उल्लेख’ न हटवणारे प्रकाशक आणि संबंधित संस्था यांवर भारतीय न्याय संहिता कलम २९९ – धार्मिक भावना दुखावणे आणि महापुरुषांचा अपमान करणे, तसेच कलम १९६ म्हणजे विविध गटांमध्ये तेढ निर्माण करून सामाजिक शांतता भंग करणे या कलमांन्वये फौजदारी गुन्हे नोंद करण्यात यावेत. ‘ई-कॉमर्स’ संकेतस्थळे आणि अन्य संकेतस्थळे यांवर उपलब्ध असलेल्या या पुस्तकाच्या ‘डिजिटल’ प्रती आणि पी.डी.एफ्. सायबर कायद्यांतर्गत ‘ब्लॉक’ करण्यात याव्यात.
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री