
चिपळूण, २७ एप्रिल (वार्ता.) – हिंदुविरोधी शक्तींचे संकट हिंदूंच्या दारापर्यंत घोंगावत आले आहे. हिंदूंनी हे धोके वेळीच ओळखले पाहिजेत. त्या दृष्टीने स्व-संरक्षणासाठी घराघरांत सिद्धता असली पाहिजे. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदू पराकोटीचा शिष्टाचार करतो. आपण आक्रमक असायला हवे. आपण हतबल व्हायला नको. हिंदूंना समूह शक्तीचा विसर पडला आहे. आपल्याला शौर्यशाली परंपरा आहे, आता हिंदूंनी स्वतःतील शौर्य जागृत करायला हवे, असे परखड प्रतिपादन संमेलनातील प्रमुख वक्ते विश्व हिंदु परिषदेचे मंदिर अर्चक आयमचे कोकण प्रांत सहप्रमुख श्री. जगन्नाथ सुर्वे यांनी केले.
ते पाग-चिपळूण येथील ‘कैलास भवन’ येथे आयोजित सकल हिंदु संमेलनात बोलत होते. कार्यक्रमाचा प्रारंभ श्री. जगन्नाथ सुर्वे, प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक श्री. समीर ताम्हाणे आणि संयोजक श्री. काका चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. या वेळी संत वाङ्मयाचे अभ्यासक श्री. धनंजय चितळे यांच्यासह मोठ्या संख्येने धर्मप्रेमी हिंदू उपस्थित होते.
हिंदु संमेलनात शौर्यजागृती पर लाठीकाठी, मल्लखांब प्रात्यक्षिके, वर्षभरातील सण-उत्सवांचे प्रात्यक्षिके, पोवाडे अशा प्रकारे कार्यक्रमाचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ओंकार रानडे यांनी केले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री उदय चितळे, परेश चितळे, मिलिंद पुरोहित, सुयोग चव्हाण, सहसंयोजक अनुप चितळे, गजानन पाटणकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी चांगले प्रयत्न केले. कार्यक्रमाची सांगता ‘सम्पूर्ण वन्दे मातरम्’ने झाली.
श्री. जगन्नाथ सुर्वे पुढे म्हणाले, ‘‘शौर्य परंपरा, सण-उत्सव यांत देशभरात साम्य आहे, याचे कारण आरती, सामूहिक स्तोत्रपठण, मंदिरातून ग्रंथपठण असे उपक्रम पूर्वीच्या काळी सामूहिकरित्या केले जायचे आणि त्यामुळेच देशभरात या गोष्टींमध्ये साम्य आहे. समूह शक्ती (संघटित शक्ती) निर्माण होण्यासाठी पुन्हा गावागावांत सामूहिक उपासना चालू करण्याची आवश्यकता आहे. हिंदुविरोधी शक्ती देशाला गिळायला आलेली आहे आणि हिंदू मात्र स्वतःच्या ‘मुलाचे भवितव्य, मुलगा चांगला शिकला पाहिजे’, या विचारांत गुंतला आहे. यातून हिंदूंनी बाहेर पडले पाहिजे. प्रत्येक तरुणाला, एक सजग हिंदू म्हणून जगायचे आहे.’’
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान