
मुंबई – वारकरी संप्रदायाविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून विविध ठिकाणी तक्रारी आणि निवेदने देण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने नोंद घेत संवेदनशीलता दाखवली. महाराष्ट्र ही संत, वारकरी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित अशी पवित्र भूमी आहे. वारकरी संप्रदायात कार्य करणार्या कोणत्याही व्यक्तीच्या केसालाही धक्का लागणार नाही. आपण कोणतीही चिंता करू नये. आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
‘शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने’चे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मान्यवर कीर्तनकारांशी थेट संवाद साधला. या संवादाद्वारे वारकरी संप्रदायाच्या भावना समजून घेत त्यांना आश्वस्त करण्यात आले. ‘आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान हे नेहमीच राजकीय अधिष्ठानापेक्षा श्रेष्ठ राहिले आहे आणि पुढेही तसेच राहील’, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवादाच्या वेळी दिले.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा