
ठाणे, २३ एप्रिल (वार्ता.) – ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील २ अधिकार्यांना २० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे. शंकर सोमनाथ आरे (वय ४४ वर्षे) आणि श्रीकांत अनंत खंडागळे (वय ५६ वर्षे) अशी अधिकार्यांची नावे आहेत. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी. – संपादक) एका निवृत्त शिक्षकावरील विभागीय चौकशी बंद करून सेवानिवृत्तीचा लाभ घेण्यासाठी त्यांनी एकूण १ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यांपैकी ८० सहस्र रुपये आधीच घेतले होते. २२ एप्रिलला उर्वरित २० सहस्र रुपये घेतांना आरे यांना कह्यात घेण्यात आले. खंडागळे यांचाही सहभाग उघड झाला असून दोघांविरोधात पुढील कारवाई चालू आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
नागपूर येथे वाठोडा पोलीस ठाण्यातील लाचखोर महिला उपनिरीक्षक कह्यात !