
नागपूर – वाठोडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणाली बेनके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरीप्रकरणी कह्यात घेतले आहे. एका व्यक्तीला छेडछाडीच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून कारवाई न करण्यासाठी खासगी मध्यस्थाच्या माध्यमातून लाच मागितल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. (पोलीस प्रशासनातील लाचखोरीमुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडाल्यास नवल ते काय ? – संपादक) प्रथम त्यांनी ३० सहस्र रुपये लाच मागितली होती.
तडजोडीअंती १० सहस्र रुपये वाठोडा पोलीस ठाण्यातच स्वीकारण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. कारवाईच्या वेळी संशय आल्याने महिला अधिकार्याने ऐनवेळी लाच स्वीकारली नाही; पण लाचेची मागणी सिद्ध झाल्यामुळे वरील कारवाई करण्यात आली.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान