श्रीमद्भगवद्गीतेचा महिमा

१. डॉ. एनी बेझंट : गीता म्हणते की, जगाला घाबरून पलायन करण्याची आवश्यकता नाही. बाधा जगात नसून आपल्या अंतरात आहे. ती अंतरातील बाधा गीता अध्ययनाने दूर होऊन मनुष्य निर्भय होऊन जीवन जगू शकतो.

२. भगिनी निवेदिता : गीता भारताचा प्राणवायू आहे. गीतेमुळेच भारत जिवंत राहील.

३. जम्भेश्वरजी महाराज : भगवान श्रीकृष्णाच्या वाणीतून उदय झालेली गीता ही काही सर्वसामान्य कविता नाही, तर ती एक अनाहत नाद आहे. ती कोणत्याही कवीची काल्पनिक कविता नाही. तुमच्या अंतरात वास करणार्‍या अज्ञानाला नष्ट करणारी महाऔषधी आहे.

४. पंडित मदन मोहन मालवीय : माझा विश्वास आहे की, पृथ्वी मंडळातील प्रचलित भाषांपैकी भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेसमान संक्षिप्त रूपातील; पण विपुल ज्ञानपूर्ण दुसरा कोणताच ग्रंथ नाही.

५. लाला लजपतराय : जेव्हा संशयाचा राक्षस तुम्हाला भयभीत करून तुम्हाला पथभ्रष्ट करण्याचा प्रयत्न  करतो. तेव्हा प्रत्येक वेळी साक्षात् भगवान श्रीकृष्ण तुमच्याजवळ रहाणे कठीण असते. अशा संकटकाळी मानवाची आवश्यकता पूर्तीसाठी भगवंताने गीतेद्वारा अनंत संदेश दिले आहेत.

६. विनोबा भावे : आईच्या दुधावर माझ्या शरिराचे जेवढे पोषण झाले, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने माझे हृदय आणि बुद्धी यांचे पोषण गीतेच्या ज्ञानदुधाने केले आहे.

७. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् : गीता जीवनाच्या सर्वाेच्च ध्येयांना हृदयापासून साध्य करण्यात साहाय्य करते. यामध्ये धर्माच्या त्या मूळ विचारधारांवर जोर दिला आहे, जो केवळ प्राचीनच नाही, ना केवळ आधुनिक आहे, तर उलट चिरंतन आणि शाश्वत आहे.

८. स्वामी श्रीरामसुखदासजी महाराज : गीतेमध्ये साधकासाठी उपयुक्त संपूर्ण सामुग्री आहे. गीतेचे मुख्य ध्येय ‘मानवजातीचे कल्याण करणे’, हेच आहे.

(साभार : मासिक ‘कल्याण’)