ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष, विश्वस्त आणि उत्तरदायी अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंद !

नाशिक – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामातील साडेबावीस किलो चांदी गहाळ झाली आहे. येथील व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे सुट्टीवर असतांना रात्री विश्वस्तांनी गर्भगृहातील चांदी काढल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातील चौकशीत निदर्शनास आले आहे. या प्रकरणी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष, विश्वस्त आणि उत्तरदायी अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. ‘अपहार झालेल्या चांदीची रक्कम व्याजासह वसूल करावी’, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. त्यांनी विभागीय आयुक्तांकडेही तक्रार केली आहे.
🚨 22.5 kg Silver Missing from Saptashrungi Gad Mandir
Criminal cases have been registered against the then-chairman, trustees, and other officials of the Trust. ⚖️
This is the direct consequence of government control over temples. Those responsible for this shocking theft… pic.twitter.com/EG4QIOSuh7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 23, 2026
१. गर्भगृहातील नक्षीकामासाठी पूर्वीच्या नोंदीनुसार अनुमाने ४०६ किलो चांदी वापरली होती; पण प्रत्यक्ष मोजणीत ती ३८३ किलो ७०३ ग्रॅम इतकीच आढळली.
२. अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ यांनी चौकशीचा आदेश दिला आहे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयानेही साहाय्यक जिल्हाधिकारी (कळवण), तहसीलदार कळवण तसेच ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी यांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘या प्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवावा’, अशी मागणी द्यानद्यान यांनी केली होती.
३. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी विश्वस्तांकडून केले गेलेले काळाबाजाराचे प्रकरण उघड झाले. त्यामुळे त्र्यंबकेश्वरप्रमाणेच येथेही चौकशी केल्यास तत्कालीन विश्वस्तांचा मोठा गैरकारभार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी विश्वस्तांकडून अनेक चुकीचे प्रकार घडले असून चौकशीत ते उघड होण्याची शक्यता आहे.
४. सप्तशृंगी ट्रस्टने १५ सप्टेंबर २०२१ या दिवशी ठराव करून चांदी दिवसा काढण्याचे नियोजन केले होते; परंतु दुसर्याच दिवशी रात्री मूल्यमापकाच्या अनुपस्थितीत गर्भगृहातील चांदी उतरवण्यात आली. यासंदर्भात ट्रस्टचे व्यवस्थापक दहातोंडे यांनी अध्यक्ष आणि धर्मादाय आयुक्तांना दिलेले पत्र पुरावा ठरले. याचा मनात राग धरून विश्वस्तांनी दहातोंडे यांच्या विरोधात कटकारस्थान करून त्यांच्यावरच निलंबनाची कारवाई केली.
सत्य बाहेर आणण्याची मागणी !मंदिरातील चांदी ही भाविकांच्या श्रद्धेची ठेव आहे. तिच्या संरक्षणाचे दायित्व असलेल्यांकडूनच अपप्रकार होत असेल, तर ते समाजासाठी धोक्याचे आहे. या प्रकरणी सत्य बाहेर यावे. – विठोबा द्यानद्यान, सामाजिक कार्यकर्ते |
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena