
मुंबई – येथे एका संगीत कार्यक्रमात सहभागी होत ‘एक्स्टॅसी’ हा अमली पदार्थ विकणार्या महाविद्यालयीन तरुणांच्या टोळीला विनातिकीट प्रवेश नसलेल्या दरवाजातून आत सोडणारा सुरक्षारक्षक प्रदीप गुप्ता याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने २ सहस्र रुपये घेऊन या टोळीला आत सोडले होते. त्याची चौकशी चालू आहे.
या प्रकरणी अटकेत असलेल्या आयोजकांपैकी आकाश सामल, सनी जैन आणि बालकृष्णन् कुरूप यांच्याकडे चौकशी करण्यात आली; मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. अटकेत असलेला आयुष अमली पदार्थ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याची आणि अटकेतील अन्य आरोपींची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार आहे.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !