उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. कृष्णाली दर्शन मोरे ही या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२६ मध्ये चि. कृष्णाली दर्शनमोरे हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.’ – संकलक)
चि. कृष्णाली दर्शन मोरे हिची तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.
१. राष्ट्रध्वजाप्रती आदर
‘एकदा आम्ही बाहेर जात होतो. तेव्हा तहसीलदार कार्यालयाबाहेर ध्वज फडकत होता. ते पाहून कृष्णालीने लगेच त्याला वाकून नमस्कार केला.
२. ती तिच्याकडचा खाऊ आधी सर्वांना देते आणि नंतर स्वतः घेते.
३. ती प्रतिदिन अंघोळ झाल्यानंतर तुळशीला पाणी घालते.
४. देवाची आवड
कृष्णाली तिच्या आईने पोळ्या करण्यासाठी भिजवलेल्या कणकेतील थोडी कणिक घेते आणि त्यापासून ती देवतांच्या मूर्ती बनवते. एकदा तिने कणकेपासून शिवपिंडी आणि पार्वतीदेवी अन् गणपतीबाप्पा यांच्या मूर्ती बनवल्या होत्या.
५. सेवेची आवड
एकदा आम्ही श्रावण सोमवारी शिवाच्या मंदिरात ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेला गेलो होतो. तेव्हा कृष्णालीही आमच्या समवेत होती. तिने तेथे सात्त्विक उत्पादने व्यवस्थित ठेवली. तिने मंदिरातली पायपुसणी स्वतःहून व्यवस्थित करून ठेवली. खाली सांडलेला प्रसाद तिने उचलून बाजूला ठेवला.
६. साधक, संत, सद्गुरु आणि देव यांच्या प्रती भाव
अ. एकदा कृष्णालीने तिच्या वडिलांना सांगितले, ‘‘सर्व साधकांमध्ये गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) रूप आहे.’’
आ. एकदा ती झोपेत म्हणत होती, ‘मला पू. करंबेळकरआजी (पू. (सौ.) अंजली करंबेळकर (सनातनच्या १३३ व्या संत, वय ६८ वर्षे) यांना भेटायचे आहे.’
इ. तिला पू. (सौ.) अंजली करंबेळकर, सद्गुरु सत्यवान कदम आणि सद्गुरु स्वाती खाडये यांना भेटण्याची पुष्कळ उत्सुकता असते.
ई. एकदा तिने श्रीरामाचे चित्र पाहिल्यावर ती सहजतेने म्हणाली, ‘‘रामबाप्पा मंदिरातच नाही, तर आपल्या हृदयात रहातात.’’
७. स्वभावदोष
हट्टीपणा.’
– सौ. दुर्वा दर्शन मोरे (चि. कृष्णालीची आई) आणि श्री. दर्शन जनार्दन मोरे (कृष्णालीचे वडील), जालगाव, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. (२४.२.२०२६)
सात्त्विकतेची ओढ असणारा ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बारामती (जिल्हा पुणे) येथील चि. श्रीहरि वैभव कुंभार (वय १ वर्षे ९ मास) !
शिकण्याची वृत्ती आणि नामजपाची आवड असलेली ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. मृणाल नीलेश जोशी (वय १४ वर्षे) !
शांत, नम्र आणि देवाची आवड असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कोथरूड, पुणे येथील कु. अद्वैत सागर पाटील (वय १५ वर्षे) !
उत्तम आकलनक्षमता, जिज्ञासू वृत्ती आणि देवाची ओढ असलेली परभणी येथील ५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. संस्कृती चिद्रावार (वय ११ वर्षे) !
देवाची आवड असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोल्हापूर येथील चि. अर्जुन ओंकार जगदाळे (वय ४ वर्षे) !
साधनेची ओढ असलेली ५२ टक्के आध्यात्मिक पातळीची वरळी, मुंबई येथील कु. आर्या प्रशांत वैती (वय १८ वर्षे) !