मध्यप्रदेश : राहुल बनून अब्दुल पठाणकडून हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार

  • पीडितेचा केला गर्भपात

  • धर्मांतरासाठी दबाव

  • बुरखा घालण्यास आणि कलमा (अल्लाचा गौरव करणारी विधाने) वाचण्याची बळजोरी

आरोपी अब्दुल पठाण

इंदूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण समोर आले आहे. येथील १९ वर्षांच्या पीडित हिंदु विद्यार्थिनीने अब्दुल अजीज पठाण याच्यावर बलात्कार, ब्लॅकमेलिंग, धर्मांतरासाठी दबाव आणणे इत्यादी गंभीर आरोप केले आहेत. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अब्दुल अजीज पठाण याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला कह्यात घेतले आहे.

१. पीडितेच्या म्हणण्यानुसार १ वर्षापूर्वी तिची आरोपीशी ओळख झाली होती. त्याने खोटी ओळख करून देऊन स्वतःचे नाव राहुल असल्याचे सांगितले होते. संवाद वाढल्यानंतर आरोपीने विश्वास संपादन करून लग्नाचा प्रस्ताव ठेवला. एक दिवस तो तिला त्याच्या  घरी घेऊन गेला. तेथे घरच्यांच्या अनुपस्थितीचा लाभ घेत त्याने लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

२. पीडित हिंदु मुलीने लग्नाविषयी बोलल्यावर आरोपीने त्याची खरी ओळख अब्दुल अजीज पठाण अशी सांगितली आणि लग्नासाठी धर्मांतराची अट घातली. त्यानंतर तो सतत तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणू लागला.

३. पीडितेने विरोध केल्यावर आरोपीने तिचा अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली आणि त्याच आधारावर अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिला नशेचे पदार्थ खाऊ घातले आणि बलपूर्वक बुरखा घालण्यास, तसेच कलमा (अल्लाचा गौरव करणारी विधाने) वाचण्यास भाग पाडले.

४. आरोपीने पीडित मुलीला गर्भपात करण्यास भाग पाडले.

५. पीडित विद्यार्थिनीने त्रस्त होऊन इंदूर सोडले आणि ती तिच्या घरी छिंदवाडा येथे गेली अन् कुटुंबियांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशमधील लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता, ते जणू लव्ह जिहादचे केंद्र बनत असल्याचे चित्र आहे. तेथे भाजपचे सरकार असतांना हिंदूंना हे अपेक्षित नाही !