
वेंगुर्ला – हिंदूंनी केवळ संघटित होणे महत्त्वाचे नाही, तर सामर्थ्यसंपन्न हिंदूंचे संघटन महत्त्वाचे आहे. १ सहस्र बकर्यांचा कळपही एका वाघाच्या डरकाळीने पळून जातो. आपल्याला १०० वाघांचे संघटन हवे आहे. त्यासाठी चांगले कमवलेले शरीर आणि मानसिक कणखरता हवी. राम-कृष्ण यांच्या गोष्टी सांगून मुलांना घडवा. ‘आम्ही पुष्कळ कष्ट केले. आता आमच्या मुलांना त्रास नको’, अशी चुकीची मानसिकता पालकांनी सोडावी. मुलांनी पालकांपेक्षा अधिक कष्ट केले, तरच भावी पिढी अधिक सशक्त आणि निरोगी होईल. केवळ दुर्जनांच्या नाशासाठी ईश्वर अवतार घेत नाही, तर ‘परित्राणाय साधुनाम् । (सज्जनांचे रक्षण)’, हाही उद्देश असतो. त्यामुळे साधना, देवाची उपासना आणि भक्ती महत्त्वाची आहे. ती वाढवली पाहिजे, असे आवाहन वायंगणी (तालुका मालवण) येथील वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी यांनी शिरोडा येथे समस्त हिंदूंना केले. या संमेलनाला ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांची उपस्थिती लाभली होती.
शिरोडा येथील गुरुवर्य वि.स. खांडेकर विद्या प्रतिष्ठानच्या गुरुवर्य अ.वि. बावडेकर विद्यालय, बी.एम्. गोगटे ज्युनिअर कॉलेजच्या पटांगणात ‘सकल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या पूर्वी पारंपरिक वेशभूषा आणि स्फूर्तीदायक घोषणांसह काढण्यात आलेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. त्यानंतर शंखनाद, वेदमंत्रपठण आणि गोमातेचे पूजन करून संमेलनाला प्रारंभ करण्यात आला.
या वेळी व्यासपिठावर प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे (संगमेश्वर), सकल हिंदू संमेलन समितीचे संयोजक प्रमोद नाईक, सहसंयोजक प्रकाश रेगे आणि सहसंयोजिका सौ. सुहिता परब उपस्थित होत्या.
हिंदूंनी जात-पात विसरून संघटित येणे काळाची आवश्यकता ! – श्रीनिवास पेंडसे, संगमेश्वर
‘हिंदूंनी जात-पात विसरून हिंदु म्हणून संघटित होणे काळाची आवश्यकता बनली आहे. अंतर्गत मतभेद आणि दुर्बलता यांचा लाभ आक्रमकांनी घेतला. त्यामुळे हिंदु समाजाने या चुका पुन्हा होऊ देऊ नये. आपण संघटित नसल्याने आपल्यावर अन्याय होतो. पुन्हा पुन्हा पारतंत्र्यात जाण्याची वेळ यामुळेच आली. आता पालट व्हायला हवा. तरुण पिढीवर देशभक्तीचे संस्कार घरातून म्हणजे आई वडिलांनीच केले पाहिजेत. तसेच देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले ? त्यासाठी किती जणांनी बलीदान दिले ? याचा खरा इतिहास तरुण पिढी समोर आला पाहिजे. आजच्या स्थितीला आपला देश, धर्म आणि संस्कृती यांच्यापुढे धर्मातर, लव्ह जिहाद, गोहत्या अशी अनेक आव्हाने उभी आहेत. धार्मिक विधींसाठी लागणारी फळे विकणारे अहिंदु, प्रतिदिनची भाजी, केशकर्तन, साैंदर्यवर्धनालय (ब्युटीपार्लर) सगळीकडेच अहिंदु हे धोकादायक आहे. अनेक हॉटेलसुद्धा हिंदूंच्या नावाने अहिंदु चालवतात आणि हिंदूंची फसवणूक करतात. अशा परिस्थितीत आपण हिंदु समाजाने सर्व प्रकारचे मतभेद विसरून एक होणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रमुख वक्ते तथा व्याख्याते श्री. श्रीनिवास पेंडसे (संगमेश्वर) यांनी या वेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जयवंत राय, परिचय रवींद्र पणशीकर आणि आभार प्रकाश रेगे यांनी मानले. श्री. शेखर पणशीकर यांनी म्हटलेल्या संपूर्ण वन्दे मातरम् या राष्ट्रीय गीताने संमेलनाची सांगता झाली.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक