ॲक्सिस बँकेत असतांना माझ्यासमोरही धर्मांतर किंवा लैंगिक शोषण करण्याचे प्रकार घडले ! : Amruta Fadnavis

मुंबई – मी ॲक्सिस बँकेत कामाला असतांना माझ्यासमोरही धर्मांतर किंवा लैंगिक शोषण करण्याचे प्रकार घडले होते. कित्येक पुरुषांनी त्यांच्या पदाचा अपलाभ उठवून स्त्रियांना त्रास देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तक्रार झाल्यावर वरिष्ठांनी तात्काळ नोंद घेऊन कारवाई केली होती. तेथील अनैतिक व्यवहारांची माहिती उघड होऊन कारवाई झाली आहे.

असे झाले की, समाजाला आणि वरिष्ठांना सांगणे आवश्यक आहे, तर त्याला आळा घालता येईल. अशी प्रकरणे पाहिली की, खेद वाटतो. व्यावसायिक (कॉर्पाेरेट) क्षेत्रात असे घडते, असा अनुभव मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांनी सांगितला.  सध्या चालू असलेल्या नाशिकमदील टी.सी.एस्. आस्थापनातील धर्मांतर आणि लैंगिक शोषण या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.

संपादकीय भूमिका

जर एका बँकेमध्येही असे प्रकार घडले असतील, तर देशातील सर्वच व्यावसायिक क्षेत्रांची झाडाझडती घेण्याची आवश्यकता निर्माण होते !