गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानची रत्नदुर्ग महादरवाजा संवर्धन मोहीम

रत्नागिरी – ऐतिहासिक रत्नदुर्गावर महादरवाजा परिसरात गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी विभाग यांच्या वतीने नुकतीच व्यापक संवर्धन मोहीम राबवण्यात आली. प्रतिष्ठानचे मावळे आणि रणरागिणी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मोहिमेत दुर्गावरील स्वच्छता अन् जतन यांचे काम करण्यात आले. या मोहिमेदरम्यान पुन्हा एकदा दुर्गाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि विविध प्रकारचा कचरा आढळून आला. स्वयंसेवकांनी कचरा गोळा करत स्वच्छता केली असली, तरीही ही गोष्ट अत्यंत निंदनीय असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
मागील ३ वर्षांपासून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सातत्याने रत्नदुर्गावर संवर्धन कार्य करत असूनही काही नागरिकांकडून दुर्गाचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व जपले जात नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. वारंवार स्वच्छता मोहीम राबवूनही रत्नदुर्गावर मद्यपान करून कचरा टाकण्याचे प्रकार चालूच असल्याने संताप व्यक्त होत आहे.
‘दुर्ग हे केवळ पर्यटनस्थळ नसून आपल्या इतिहासाचे जिवंत प्रतीक आहे. त्याचे जतन करणे, हे प्रत्येकाचे दायित्व आहे’, असे मत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. संबंधित प्रशासनानेही या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
‘अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही चालू रहाणार असून नागरिकांनीही दायित्वाची जाणीव ठेवून गड-दुर्गांचे पावित्र्य राखावे’, असे आवाहन करण्यात आले आहे.
आषाढी यात्रेसाठी ५ सहस्र ५०० विशेष बसगाड्यांची सुविधा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
मोशी येथील कचरा आगार दुर्घटनेच्या संदर्भात आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !