रतलाम (मध्यप्रदेश) येथे वरातीच्या वेळी धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण : २ हिंदु गंभीररित्या घायाळ

प्रतिकात्मक छायाचित्र

रतलाम (मध्यप्रदेश)  – रतलाम जिल्ह्यातील धराड येथे १४ एप्रिलच्या रात्री हिंदूंच्या विवाहच्या वरातीच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी वाद घालून चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात २ हिंदु तरुण घायाळ झाले. या वेळी दगडफेकही करण्यात आली. त्यात अनेक जण घायाळ झाले. सध्या येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी फरदीन, जिशान, शेरू, साहिद शेख, गुड्डू शेख, आरयन खान, आशिफ रेहान, इद्रीश, जावेद, अबरार, सिकंदर, वसीम आणि इमरान खान यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशात अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर अशी आक्रमणे होणे, अपेक्षित नाहीत !