
रायपूर (छत्तीसगड) – हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांता अक्का यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीच्या वेळी श्री. घनवट यांनी हिंदु जनजागृती समितीच्या विविध उपक्रमांची, तसेच राष्ट्ररक्षणासाठी समिती करत असलेल्या कार्याची सविस्तर माहिती सांगितली. यामध्ये विशेषतः ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हलाल जिहाद’ यांसारख्या गंभीर राष्ट्रीय समस्यांविषयी समिती करत असलेले जनजागृतीचे अन् प्रतिबंधात्मक कार्य यांची माहिती दिली. ही माहिती ऐकल्यानंतर शांता अक्का यांनी समितीच्या कार्याचे कौतुक करत ‘तुमचे कार्य प्रशंसनीय आहे’, असे मत व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘लव्ह जिहाद आणि हलाल जिहाद या राष्ट्रीय स्तरावरील गंभीर समस्या आहेत. त्यामुळे सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्रित येऊन या समस्यांविरुद्ध ठोस आणि संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे, तसेच या विषयांवर सरकारने वेळीच कठोर पावले उचलली पाहिजेत, अन्यथा भविष्यात त्याचे भीषण परिणाम दिसतील. लव्ह जिहाद संदर्भातील भीषणता सांगून प्रत्येक हिंदू मुलीला जागृत करून प्रत्येकीपर्यंत हा विषय पोचवणे अत्यंत आवश्यक आहे.’’
🚩 Hindu Organizations Must Unite to Stop Various Forms of Jihad! – Shanta Akka Ji
📍 Raipur (Chhattisgarh): @SG_HJS, Maharashtra & Chhattisgarh Coordinator of @HinduJagrutiOrg, paid a courtesy visit to Shanta Akka Ji, Pramukh Sanchalika of Rashtra Sevika Samiti.
During the… pic.twitter.com/tYANKO7KBt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 16, 2026
या भेटीच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री कमाल बिसवाल, सच्चिदानंद उपासने, हेमंत उपासने, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री हेमंत कानस्कर आणि नीरज क्षीरसागर उपस्थित होते. याप्रसंगी शांता अक्का यांना हिंदु जनजागृती समितीचे ‘हलाल अर्थव्यवस्था’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांविषयीचे ग्रंथ भेट देण्यात आले.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court