परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ४ बसस्थानकांचे उद्घाटन होणार !

प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

कोल्हापूर – राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे १७ एप्रिल या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार असून त्यांच्या हस्ते शासननिधीतून बांधण्यात आलेल्या कोल्हापूर शहरातील ‘एस्.टी.’च्या नूतन छत्रपती संभाजीनगर बसस्थानकासह ४ बसस्थानकांचे उद्घाटन होणार आहे. यात छत्रपती संभाजीनगर बसस्थानकाचे उद्घाटन दुपारी ४ वाजता होणार आहे. या दौर्‍यात मंत्री सरनाईक कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाची पहाणी करणार असून सकाळी ११.३० वाजता कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीचे, तर दुपारी २.३० नृसिंहवाडी येथे श्री दत्त महाराजांचे दर्शन घेणार आहेत.