
नागपूर (वार्ताहर) – ‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून युवकांना टोळीच्या माध्यमातून लुटले जात आहे. ‘डेटिंग ॲप’वरून युवकांशी ओळख वाढवून त्यांना ‘सुआ क्लब अँड रेस्ट्रो’ या उपाहारगृहात तरुणीच्या साहाय्याने बोलावण्यात येते. संबंधित तरुणी महागड्या मद्याची आणि पदार्थांची मागणी देते. या लुटीमध्ये उपाहारगृह व्यवस्थापनाचाही सहभाग असल्याचा संशय आहे; कारण ३० ते ३५ सहस्र रुपयांचे देयक झाल्यावर तरुणी उपाहारगृहामधून निघून जाते आणि देयकाचा भार युवकावर टाकला जातो. संबंधित तरुणीला प्रत्येक देयकामागे १० ते २० टक्के ‘कमिशन’ (दलाली) मिळते. आतापर्यंत ४ – ५ युवक या जाळ्यात अडकले होते. या प्रकरणी पीडित युवकाने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक