
कोल्हापूर – ‘करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’साठी केल्या जाणार्या भूसंपादनासाठी सर्वेक्षण प्रक्रिया चालू करण्याचे आदेश देण्यात आले. हे आदेश ‘क्षेत्रीय पडताळणी आणि मूल्यांकन समिती’च्या अध्यक्षा तथा करवीरच्या प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या समितीची बैठक झाली, त्या वेळी दिले.
या समितीकडून संपादित केल्या जाणार्या प्रस्तावित क्षेत्रातील सर्व सर्व्हे क्रमांक, तसेच त्या सर्व क्षेत्रांची अचूक सूची केली जाणार आहे. ज्या भूमीचे संपादन केले जाणार आहे, त्या भूमीच्या सर्व कागदपत्रांच्या आधारे मूळ मालक आणि इतर हक्कातील व्यक्ती यांची माहिती संकलित केली जाणार आहे. यानंतर या भूमीवरील सध्याची स्थिती काय आहे ? याच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर या भूमीवरील विहिरी, कूपनलिका, घरे, झाडे यांची मोजणी केली जाणार आहे. या जागांचे चालू ‘रेडीरेकनर’नुसार (सरकारी भूमी, सदनिका आणि व्यावसायिक गाळ्यांच्या अंदाजित बाजारमूल्यानुसार) प्राथमिक मूल्यांकन केले जाईल. पुढे याविषयीचा अहवाल देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार आहे. या भूसंपादनासाठी ७८१ कोटी रुपयांचा निधी व्यय केला जाणार आहे.
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)