
सोलापूर – भारतीय संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्ये ही हिंदु संस्कृतीतूनच उद्भवलेली असून त्या आधारावरच भारताची ओळख निर्माण झाली आहे. समाजात एकजूट, राष्ट्रभक्ती आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्याची आवश्यकता आहे. जो हिंदु आहे, तोच भारतीय आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूनंतर ज्यांना दुःख झाले, ते भारतीय नाहीत. देशात काही विदेशी शक्ती कार्यरत असून देशद्रोही प्रवृत्तींविरुद्ध ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे. अशा प्रवृत्तींसाठी हिंदु समाज एकत्र येणे आवश्यक आहे. भारताच्या अस्मितेसाठी आणि भारतीयत्वाच्या जपणुकीसाठी सातत्याने कार्य करणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष हे संपूर्ण समाजासाठी आनंदोत्सवाचे पर्व आहे, असे मत हिंदु राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त हिंदु संमेलन समितीच्या वतीने १२ एप्रिल या दिवशी हिंदु संमेलन बाळीवेस येथील विजय चौक येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून हिंदु राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनजंय देसाई, अध्यक्षस्थानी श्री नाथ संस्थानचे ह.भ.प. श्रीरंग महाराज गहिनीनाथ औसेकर, डॉ. सचिन लादे आदी उपस्थित होते. संमेलनाच्या प्रारंभी ‘श्री रामदेव बाबा सत्संग संघ शेळगी’ येथील कार्यकर्त्यांनी हनुमानचालिसाचे पठण केले. श्री. गजानन धरणे यांनी प्रास्ताविक केले, तर श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले, तसेच श्री. योगेश सरगर यांनी आभार मानले.
पंढरपूरचे डॉ. सचिन लादे म्हणाले की, कुटुंब संवाद, समरसता, सुबोध, समाज शिष्टाचार आणि पर्यावरण अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पंचतत्त्वे आहेत. स्वातंत्र्य चळवळीत संघाने काम केले आणि हिंदु समाजाला संघटित करण्याचे काम संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांनी केले.
या वेळी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, भाजपचे नगरसेवक शिवराज गायकवाड, विराट हिंदु संमेलन समितीचे श्री. योगेश सलगर, श्री. सचिन कुलकर्णी, श्री. श्रीशैल विभुते, श्री. केदारनाथ दामा, श्री. शिवानंद सावळगी, हिंदु राष्ट्र सेनेचे शहरप्रमुख श्री. रवि गोणे, हिंदु राष्ट्र सेनेचे शहरसंघटक श्री. आनंद मुसळे, श्री. श्रीधर आरगोंडा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश पांढरे, श्री. विनोद रसाळ आदी उपस्थित होते.
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !