बालतस्करीचा संशय, ८ जणांना अटक
लातूर येथे मदरशात शिक्षणासाठी नेले जात असल्याचा सद्दाम नावाच्या व्यक्तीचा दावा

पुणे – बिहारची राजधानी पाटलीपुत्रहून पुण्याकडे जाणार्या १६७ अल्पवयीन मुसलमान मुलांची ११ एप्रिलच्या रात्री मध्यप्रदेशातील कटनी रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई पाटणा-पूर्णा एक्स्प्रेसमध्ये करण्यात आली असून या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीस यांच्या साहाय्याने या मुलांची रेल्वेतून सुटका करण्यात आली. चौकशीच्या वेळी असे समोर आले की, ही सर्व मुले बिहारमधील अररिया येथून महाराष्ट्रातील लातूरला एका मदरशामध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवास करत होती. बाल तस्करीचा संभाव्य प्रयत्न रोखण्याविषयी गुप्त माहितीच्या आधारे बाल कल्याण समितीच्या पथकाने ही कारवाई केली.
अररियाहून लातूरमधील मदरशामध्ये या मुलांना घेऊन जाणार्या सद्दाम नावाच्या व्यक्तीने सांगितले की, गेल्या १० वर्षांपासून तो मुलांना लातूरमधील मदरशामध्ये शिक्षणासाठी घेऊन जात आहे. त्याने पुढे सांगितले की, या वेळीही तो अनुमाने १०० मुलांना त्यांच्या पालकांच्या पूर्ण संमतीनेच घेऊन जात होता.
या प्रकरणावर भाष्य करतांना बाल संरक्षण अधिकारी मनीष तिवारी यांनी सांगितले की, रेल्वेगाडीतून १०० हून अधिक मुलांची संभाव्य तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे या मुलांची सुटका केली. त्यांची चौकशी चालू केली आहे.
चौकशीच्या वेळी मुलांनी सांगितले की, ते लातूरमधील एका मदरशामध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवास करत होते. सध्या या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या खटल्याच्या प्रत्येक पैलूची सखोल चौकशी चालू करण्यात आली आहे.
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !