वणी (जिल्हा यवतमाळ) येथे ३ धर्मांधांवर गोमांस विक्री-तस्करी प्रकरणी गुन्हे नोंद  

  • बजरंग दलाच्या पुढाकाराने पोलीस कारवाई

  • १५० किलो गोमांस जप्त  

AI निर्मित चित्र

वणी (जिल्हा यवतमाळ), ११ एप्रिल (वार्ता.) – येथील गोकुळनगर परिसरात चंद्रपूर येथून गोमांस तस्करी आणि विक्री करणारे सलमान शकील शेख (वय २५ वर्षे), नावेद शेख रियाज (वय २३ वर्षे), अब्दुल माजिद अब्दुल सत्तार (वय ३५ वर्षे) यांना कह्यात घेऊन गुन्हे नोंदवण्यात आले. या प्रकरणाची गोपनीय माहिती मिळाल्यावर बजरंग दलाचे श्री. विशाल दुधबळे आणि अन्य कार्यकर्ते यांनी पहाटे पाळतीवर राहून पोलिसांना साहाय्य केले. (असे सतर्क आणि कृतीशील गोरक्षक सर्वत्र हवेत ! – संपादक) या वेळी १५० किलो गोमांस जप्त करण्यात आले. (सक्षम यंत्रणा असतांनाही गोरक्षकांना मळणारी माहिती पोलिसांना का मिळत नाही ? – संपादक) 

संपादकीय भूमिका

या धर्मांधांवर गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार कठोर कारवाई व्हायला हवी, अशी गोप्रेमींची अपेक्षा !