Jasveen Sangha : अमेरिकेत ‘केटामाइन क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंजाबी वंशाच्या जसवीन संघा हिला १५ वर्षांची शिक्षा !

(केटामाइन म्हणजे एक प्रकारचा अमली पदार्थ)

जसवीन संघा व मॅथ्यू पेरी

जालंधर (पंजाब) – अमेरिकेत ‘केटामाइन क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंजाबी वंशाच्या जसवीन संघा नावाच्या महिलेला १५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ‘लॉस एंजेलिस फेडरल कोर्ट’च्या न्यायाधीश शेरिलिन पीस गार्नेट यांनी ८ एप्रिल या दिवशी शिक्षा सुनावतांना सांगितले की, जसवीन संघा उच्चभ्रू ग्राहकांना अमली पदार्थ  पुरवून विलासी जीवन जगत होती. ‘फ्रेंड्स’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते मॅथ्यू पेरी याच्या मृत्यूमध्ये तिचा थेट सहभाग होता. पेरीचा केटामाइनच्या अतीसेवनामुळे वर्ष २०२३ मध्ये मृत्यू झाला होता. जसवीनने स्वतः स्वीकृती दिली होती की, तिने पेरीला केटामाइन विकले होते.

जसवीन संघा हिचा जन्म २२ जुलै १९८३ या दिवशी लंडन (ब्रिटन) येथे झाला होता. तिची आई नीलम सिंह आणि वडील बलजीत सिंह छोकर उद्योगपती आहेत. तिचे आजोबा-आजी लंडनमध्ये ‘फॅशन रिटेल’ व्यवसाय करतात आणि ते उच्चाभ्रु कुटुंबाशी संबंधित आहेत. हे कुटुंब नंतर कॅलिफोर्नियातील कॅलाबासास येथे स्थलांतरित झाले होते. जसवीन हिच्याकडे अमेरिका आणि ब्रिटनचे दुहेरी नागरिकत्व आहे.