घरात आढळल्या होत्या ५००च्या जळालेल्या नोटा !
अलाहाबाद उच्च न्यायालयाने न्यायिक कामांतून ठेवले होते दूर !

प्रयागराज – अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी राष्ट्रपतींकडे त्यांचे त्यागपत्र सादर केले आहे. १४ मार्च २०२५ या दिवशी त्यांच्या देहलीतील घरात लागलेल्या आगीत ५०० रुपयांच्या नोटांचा गठ्ठा जळालेल्या अवस्थेत सापडला होता. या वादामुळे त्यांचे देहली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात स्थानांतर करण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध चालू असलेली चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना न्यायिक कामांपासून दूर ठेवण्यात आले होते.
रोख रकमेच्या प्रकरणात नाव आल्यानंतर न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध लोकसभेत महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला होता. न्यायमूर्ती वर्मा यांनी त्यांच्याविरुद्ध आणलेल्या महाभियोग प्रस्तावाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ६ जानेवारी २०२६ या दिवशी सर्वाेच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी चालू झाली. २ दिवसांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपिठाने ८ जानेवारीला न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. तथापि खंडपिठाने न्यायमूर्ती वर्मा यांना संसदीय समितीसमोर उत्तर देण्याची समयमर्यादा वाढून देण्यास नकार दिला होता.
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !