हिंदु विधीज्ञ परिषदेची मागणी

कोल्हापूर, ९ एप्रिल (वार्ता.) – ‘बुद्ध गार्डन’ येथील के.एम्.टी. वर्कशॉप येथे ‘इलेक्ट्रिक बस’साठी ‘चार्जिंग केंद्र’ बनवण्यासाठी महापालिकेची अनुमती न घेता वृक्षतोड करण्यात आली. वृक्ष तोडतांना ठेकेदाराने ८३० झाडे लावणे अपेक्षित असतांना त्यांपैकी एकही झाड लावले नाही, तसेच अनामत रक्कम ४ लाख १५ सहस्र रुपये जमा करणे अपेक्षित असतांना ती भरली नाही. तरी या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंद करावा, अशा मागणीचे निवेदन हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने कोल्हापूर महापालिकेच्या महापौर सौ. रूपाराणी निकम आणि महापालिका आयुक्त राजेंद्र भारूड यांना देण्यात आले. (असे निवेदन का द्यावे लागते ? – संपादक) निवेदन स्वीकारल्यावर दोघांनीही ‘या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल’, असे आश्वासन दिले. या प्रसंगी अधिवक्ता समीर पटवर्धन, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्त्या प्रीती पाटील, अधिवक्ता प्रदीप पुजारी, श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.
या संदर्भात श्री. बाबासाहेब भोपळे म्हणाले, ‘‘अशी वृक्षतोड सामान्य नागरिकाने केल्यास महापालिका प्रशासन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करते. याउलट या प्रकरणी १ वर्ष उलटूनही संबंधित ठेकेदारावर महापालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे सामान्य नागरिकाला एक न्याय आणि ठेकेदार, तसेच संबंधित महापालिका अधिकारी यांच्यासाठी वेगळा न्याय का ?’’
| ही घटना वृक्षतोड प्राधिकरण समिती सदस्य श्री. उदय गायकवाड यांनी संबंधित अधिकार्यांना लक्षात आणून दिल्यावर तत्कालीन प्रशासकांनी कारवाईच्या अनुषंगाने नोटीस देण्याचे आदेश दिले, असे इतिवृतात लिहिले आहे. यात कार्याेत्तर संमतीमध्ये अवैध वृक्षतोड असल्याने भरपाई करून घेण्याचे आदेशही दिले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणे अपेक्षित असतांना तो केलेला नाही. तरी या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यासमवेत ८३० झाडे ज्या ठेकेदाराकडून लावून घेणे अपेक्षित आहे, त्याचा पाठपुरावा करावा. संबंधित वृक्ष अधिकार्यांवर कारवाई करावी.’’ – अधिवक्ता समीर पटवर्धन |
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !