
सातारा, ९ एप्रिल (वार्ता.) – पुणे-बेंगळुरू महामार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळख असणार्या सातारा बसस्थानकामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. एस्.टी. (राज्य परिवहन) प्रशासनाच्या गलथान कारभारावर प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाला या समस्या लक्षात येत नाहीत का ? या महामंडळाशी संबंधित मंत्री महामंडळाचे उत्पन्न वाढवणे, बसस्थानकात चांगल्या नागरी सुविधा पुरवणे यांसाठी प्रयत्नशील असतांना सातारा बसस्थानक प्रशासन झोपा काढत आहे का ? – संपादक)
सातारा बसस्थानकातून पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव, कोकण, गोवा, विजापूर, नांदेड, शिर्डी यांसह अन्य ठिकाणी प्रतिदिन शेकडो बस ये-जा करत असतात. त्यामुळे बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. सध्या जुन्या मुंबई, पुणे फलाट परिसरात बसस्थानकातील कचरा टाकला जातो. त्यामुळे या परिसरात कचर्याचे ढीग साठले आहेत. कचर्यामुळे बसस्थानकाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
श्रीक्षेत्र जेजुरी येथील ‘श्री खंडोबा डोंगरा’वर मद्यपींचा धिंगाणा !
मुरुड बसस्थानक आगारातील समस्यांविषयी जनआक्रोश बैठकीचे आयोजन !
थोडक्यात महत्त्वाचे (१६.०६.२०२६)
मंदिर सरकारीकरण आणि वक्फ बोर्डाच्या अतिक्रमणाविरोधात लढा तीव्र करण्याचा निर्धार !
अन्न व औषध प्रशासन विभागाची स्वारगेट परिसरात कारवाई !
प्रशासकीय अनास्थेमुळे छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था !