या महिन्यातच विधेयक संमत होण्याची शक्यता
लोकसभेच्या जागा वाढवून ८१६ केल्या जातील
२७३ जागा महिलांसाठी आरक्षित असतील
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत नारी शक्ती वंदन अधिनियमातील सुधारणा विधेयकाच्या प्रारूपाला संमती देण्यात आली. या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागा सध्याच्या ५४३ वरून वाढवून ८१६ केल्या जातील आणि त्यांपैकी २७३ जागा महिलांसाठी आरक्षित असतील.
सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी वाढवून १६ ते १८ एप्रिलपर्यंत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण सुधारणा विधेयक संमत होण्याची शक्यता आहे. संसदेची संमती मिळाल्यानंतर हा कायदा ३१ मार्च २०२९ पासून लागू होईल. त्याच वर्षी होणार्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तो पहिल्यांदाच लागू होईल. या प्रस्तावानुसार अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षित जागांमध्येही महिलांसाठी वाटा निश्चित केला जाईल.

काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !