अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद
(सी.डी.आर्. डेटा म्हणजे संपर्क क्रमांकाच्या तपशीलाची नोंद)

मुंबई – एका व्यक्तीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भ्रमणभाषचा ‘सी.डी.आर्. डेटा’ दिला, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ६ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी अलीकडेच अशोक खरातच्या भ्रमणभाषचा ‘सी.डी.आर्. डेटा’ समोर आणला होता. त्यामुळे अंजली दमानिया यांच्याकडे खरातच्या भ्रमणभाषचा ‘सी.डी.आर्. डेटा’ कुठून आला ?, अशी चर्चा झाली होती.
अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसर्या दिवशी ‘समता पतसंस्थे’त भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाले, असे या वेळी दमानिया म्हणाल्या. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या दिवशी अशोक खरातच्या भ्रमणभाषवर समता पतसंस्थेकडून खरातला वारंवार लघुसंदेश आले होते. त्यामुळे त्यांचा काय संबंध आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी दमानिया यांनी या वेळी केली.
अजितदादांच्या घातपाताशी अशोक खरातचा संबंध आहे का ? याचे अन्वेषण ‘सीआयडी’ने (गुन्हे अन्वेषण विभागाने) करावी, अशी मागणी शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून केली आहे.
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !