आतंकवादविरोधी पथकाची कारवाई !

मुंबई – मुंबई आणि देहली येथे घातपात घडवण्याच्या सिद्धतेत असलेल्या दोन आतंकवाद्यांचा घातपाताचा कट आतंकवादविरोधी पथकाने उधळला आहे. पथक आणि देहली पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून एकाला कुर्ला, तर दुसर्याला खडवली (जिल्हा ठाणे) येथून कह्यात घेतले आहे. ‘जैश-ए-महंमद’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित काही हालचालींची माहिती देहली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर देहली पोलिसांनी ही माहिती महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाला दिली. दोन्ही आरोपींकडून भ्रमणभाष, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. अटक केल्यानंतर पुढील चौकशीसाठी त्यांना देहलीला नेण्यात आले आहे.
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक