
मुंबई – ‘फलज्योतिष अभ्यास मंडळ, पुणे’ यांच्या वतीने ज्योतिष विषयांच्या विविध पदवी परीक्षांचे आयोजन केले जाते. यांपैकी ‘ज्योतिष प्राज्ञ’ ही पदवी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये सनातनचे साधक श्री. श्रेयस पिसोळकर हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना २०० पैकी १७८ गुण प्राप्त झाले आहेत. या वेळी फलज्योतिष अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि संचालक पंडित विजय श्रीकृष्ण जकातदार यांनी भ्रमणभाष करून त्यांचे अभिनंदन केले. या वेळी पंडित जकातदार यांनी ‘यापुढेही असाच अभ्यास चालू ठेवा. तुम्ही आमच्या कुटुंबातीलच आहात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !’, असे सांगितले.
‘केवळ गुरुकृपेने हे साध्य होऊ शकले. हे यश मी श्रीगुरुचरणी अर्पण करतो. श्रीगुरुंच्या सेवेसाठीच या ज्ञानाचा उपयोग करीन’, असे मनोगत श्री. श्रेयस यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री