

कोल्हापूर, ३१ मार्च (वार्ता.) – उन्हाची तीव्रता प्रचंड वाढत असून भाविकांना त्याची तीव्रता जाणवू नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्य दर्शन रांगेत कायमस्वरूपी पत्राशेड उभारण्यात आली असून रांगांमध्ये जारमधून भाविकांना ‘थंड’ पिण्याचे पाणी दिले जात आहे. भाविकांना थंड हवा मिळण्यासाठी मोठे ‘कुलर’ बसवण्यात आले आहेत. मंदिरात आत असलेल्या दर्शन रांगेतही ऊन, पाऊस यांपासून रक्षण करण्यासाठी दर्शन रांगेच्या वर पत्र्याची शेड उभी करण्यात आली आहे. दर्शन रांगेत भाविकांना पिण्याचे थंड पाणी मिळत असल्याने या संदर्भात भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

मंदिर परिसरात उन्हाचे चटके अल्प करण्यासाठी फरशीवर मारले पांढर्या रंगाचे पट्टे !मंदिराच्या परिसरात असलेली फरशी मोठ्या प्रमाणात तापून भाविकांचे पाय भाजतात. तरी भाविकांना बसणारे हे उन्हाचे चटके अल्प करण्यासाठी देवस्थान समितीने मंदिर परिसरात पांढर्या रंगाचे विशेष ‘कूल कोट’चे पट्टे मारले आहेत. या पट्ट्यावरून चालल्यास पायाला चटके बसत नाहीत. यंदा २ मोठे पट्टे मारण्यात आले असून भविष्यात आणखी पट्टे मारण्यात येणार आहेत. |

उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !