Chandigarh Blast : चंडीगड येथील भाजप कार्यालयाबाहेरील स्फोटाच्या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक नाही !

चंडीगड – येथील सेक्टर-३७ मध्ये असणार्‍या भाजपच्या मुख्यालयाबाहेर १ एप्रिलला झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली आहे. या स्फोटात अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. या घटनेच्या संदर्भात सीसीटीव्ही चित्रीकरणात भाजप कार्यालयाजवळ असलेल्या दुसर्‍या एका कार्यालयाबाहेर २ संशयित उभे असलेले दिसत आहेत. एक व्यक्ती ग्रेनेड बाँब फेकतांना दिसला, तर दुसर्‍या चित्रीकरणात मोटारसायकलवरून जाणारे २ लोक दिसले, ज्यांना आक्रमणकर्ते म्हटले जात आहे. खलिस्तानी आतंकवादी सुखजिंदर सिंह बब्बर याने सामाजिक माध्यमांत माहिती प्रसारित केली आहे. यामध्ये खलिस्तानी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारल्याचे म्हटले आहे.