महाराष्ट्रातील ३५ महामार्गांवर पथकरात ३ ते ५ टक्क्यांची दरवाढ !

महामार्गांवर पथकरात दरवाढ

मुंबई – महाराष्ट्रातील ३५ पथकर नाक्यांवर १ एप्रिलपासून ३ ते ५ टक्क्यांची दरवाढ करण्यात आली आहे. जीप, बस आणि ट्रक अशा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पथकर महागला आहे. पथकर नाक्यांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करून केवळ फास्टॅग किंवा डिजिटल पेमेंटद्वारे पथकर भरण्याची सक्ती आहे. सोलापूर-पुणे, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि इतर प्रमुख महामार्गांवर प्रवास महागला आहे.