फेसबुकवर काम करून देतांना चूक झाल्याची भीती घालून पैसे उकळले
पणजी, ३१ मार्च (वार्ता.) – फेसबुकवर सोपे काम पूर्ण करून दिल्यावर मोबदल्याचे आमीष दाखवून नंतर कामात झालेली चूक भरून काढण्याचा बहाणा करून एका अज्ञाताने गिरी येथील सिया देसाई (वय ३१ वर्षे) या महिलेकडून २ लाख २३ सहस्र १०० रुपये लुबाडल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सिया देसाई यांनी तक्रार नोंदवल्यानंतर साळगाव पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार २० मार्च २०२६ पूर्वी एका अज्ञात व्यक्तीने फेसबुकच्या माध्यमातून सिया देसाई यांच्याशी संपर्क साधला आणि प्रारंभी त्यांना काही सोपी कामे (टास्क) पूर्ण करण्यास सांगून त्या बदल्यात त्यांना मोबदला म्हणून काही रक्कम देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या व्यक्तीने ‘तुमच्या चुकीमुळे एका व्यापार्याची पुष्कळ हानी झाली आहे’, अशी भीती घालून ही हानी भरून प्रकरण मिटवण्यासाठी सिया यांच्याकडे ७० सहस्र रुपयांची मागणी केली. सिया यांनी ही रक्कम दिल्यानंतर संशयिताने वेळावेळी विविध कारणांसाठी आणखी पैशांची मागणी केली. अशा प्रकारे संशयिताने सिया यांच्याकडून २ लाख २३ सहस्र १०० रुपये उकळले. त्यानंतर आपली फसवणूक झाली, हे लक्षात आल्यावर सिया देसाई यांनी साळगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी ३० मार्च २०२६ या दिवशी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक